सावंतवाडीच्या “घे भरारी” संस्थेच्या फणस रेसीपी प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी येथील ‘घे भरारी’ या महिलांना स्वाभिमानी, स्वावलंबी, बनविण्या-या संस्थेमार्फत फणसावर आधारित विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण शिबीर हॉटेल मेंगो येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबीरामुळे आपल्या पारंपरिक फळांपासून नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याचा एक सुंदर प्रयत्न झाला.
यावेळी महिलांना फणसापासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेताना खूप काही शिकायला मिळाले.
महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी असे उपक्रम खूप प्रेरणादायी आहेत. घे भरारी संस्थेचे रेखा कुमठेकर, मोहीनी मडगावकर, सलोनी वंजारी, मेघना राऊळ,स्वप्नाली कारेकर आदींसह महिला सभासदांनी अथक परिश्रमाने हा कार्यक्रम पार पाडला.






