न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी: पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

 सिंधुदुर्ग कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्य अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. जिल्ह्यात व इतर ठिकाणी हि साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरु पौर्णिमेच्या दिनी गुरु मानून तुम्ही मला शुभेच्छा दिल्या हीच खरी सिंधुदुर्ग वासियांची मला भेट आहे. अशा भावना कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केल्या.

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गुरुवर्य पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी ऑनलाईन गुरुवंदना दिल्या. यावेळी श्री. कर्णिक बोलत होते. तुम्हा सर्वांना माझे आशीर्वाद आहेत, असेच काम करत रहा. साहित्य, मराठी भाषा उपक्रम सातत्याने राबवा असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी ही सिंधुदुर्ग शाखेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार काम सुरू आहे. अमराठी बांधवांना मराठी भाषाचे ज्ञान देणे हि कोकण मराठी साहित्य परिषदेला शासन स्तरावरून मिळालेली चांगली भेट आहे. या उपक्रमाचा समारोप १७ ऑगस्टला ठाणे येथे होणार आहे. तसेच लवकरच कोकण मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन कोकणात घेण्याचे नियोजन आहे. असे ते म्हणाले.

जिल्हा कार्यकारिणीच्या या बैठकीत ग्रंथमित्र पुरस्कार विजेते व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा खजिनदार आनंद वैद्य व जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांचा पाईप क्लिंजर पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रांतिक सदस्य रुजारिओ पिंटो, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे, सहसचिव सुरेश पवार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी जिल्ह्यातील साहित्यिक लेखकांचे पुस्तकांचे प्रदर्शन लवकरच कुडाळ येथे घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीत जिल्हा साहित्य संमेलन, महिला संमेलन तसेच विविध उपक्रम राबवण्याबद्दल चर्चा झाली. दोडामार्ग व वेंगुर्ले देवगड या शाखा पुनर्जीवित करण्याचे ठरवण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव ॲड.    संतोष सावंत यांनी केले तर आभार सहसचिव सुरेश पवार यांनी मानले. खास पाईप क्लिंजर हा पुष्पगुच्छ आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनविणाऱ्या कु. काव्य सावंत हिचे विशेष कौतुक करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे