तिरुपती लाडू प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे आंध्रात कॉंग्रेस आमदारावर हल्ला.. घरावर दगडफेक
आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा हिंसाचार उसळला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मंत्री एन. लोकेश नायडू यांच्याविरोधात केलेल्या विधानांमुळे (राक्षस आणि चोर) राज्यात मोठा गोंधळ उडाला आहे. कृष्णा जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. जोगी रमेश यांच्या वक्तव्यानंतर इब्राहिमपट्टणममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी (दि. 1 फेब्रुवारी) रोजी इब्राहिमपट्टणम (विजयवाडा) अंजनेय स्वामी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जोगी रमेश यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. या वक्तव्यादरम्यान त्यांनी तिरुपती लाडू वाद आणि एसआयटी चौकशीबाबत मंत्री लोकेश आणि सरकारवर टीका केली. त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोगी रमेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाविरुद्ध वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यामुळे हिंसाचार झाला.”
.
वायएसआरसीपी’ पक्षाने जोगी रमेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि तो हल्ला घृणास्पद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. एका निवेदनात, वायएसआरसीपी नेते भूमना करुणाकर रेड्डी म्हणाले की, जमावाने रमेश यांच्या घरावर उधळलेल्या बैलांसारखा हल्ला केला आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, जरी त्यांनी यापूर्वी त्यांच्या टिप्पण्या स्पष्ट केल्या होत्या.


