न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आता कां बोलावं बे….. दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द

देहरादून/ वृत्तसंस्था

पेपरफुटी विरोधात आंदोलन सुरू असताना आता उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटले आहेत, त्यानंतर आता विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या घटनेतील आरोपी शिक्षक आशीष कुमार हे शिवालिक कॉलेजमध्ये प्राध्यापक असून, ते प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या टीममध्ये होते. त्यांच्यावर परीक्षेतील प्रश्नांसारखेच प्रश्न एका कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना पाठवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता परीक्षा रद्द करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

उत्तराखंडमधील पेपरफुटीच्या घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणात संबंधित महाविद्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या देशभरात पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू असताना ही घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यार्थी सातत्याने पेपरफुटी थांबवण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. संपूर्ण देशात आवाज उठवला जात असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे

वीर माधो सिंह भंडारी उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठाच्या कुलगुरू तृप्ता ठाकूर यांनी सांगितले की, संबंधित शिक्षक ज्या महाविद्यालयाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाईची करण्यात आली आहे. आमच्या विद्यापीठाने पुढील सात वर्षांसाठी त्या शिक्षकाला कोणत्याही परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपल्या 22 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे