उद्या लग्न….ऐन साखरपुड्यातच धुळ्यात शुल्लक कारणावरून आठ जणांवर चाकुचा हल्ला…तिघांचा मृत्यू
धुळे/
धुळ्यात एका लग्नसमारंभात शुल्लक वादातून आठ जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला. याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्लाकरण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेशगीर मोजगीर गोसावी (वय ५५) आणि साहील सुरेश गोसावी (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


