सांगलीत महामानवाच्या १४ फुटी पुतळ्याचे लोकार्पण
सांगली/
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पार पडत आहे.. जयंतीच्या पूर्व संध्येला सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नूतन पुतळ्याचं लोकार्पण रात्री पार पडले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आबेडकर याच्या शुभ हस्ते आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्यासह हजारो आंबेडकर अनुयायींच्या उपस्थितीमध्ये मोठया दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य 14 फुटी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातल्या एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 फुटी पुतळा नव्याने उभारण्यात आला आहे..जयंतीच्या पूर्वसंध्येला या नव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जल्लोषात व जयघोषात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत लोकपर्ण संपन्न झाले.”


