सावंतवाडीत राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.
सिंधुदुर्ग / राजू तावडे
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने आज महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, संजय साळगावकर, ड्यूमिंग अल्मेडा,लाडू जाधव, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.


