न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर संधी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

    राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना समकक्ष नियमित पदांवर सामावून घेण्याचा निर्णय शासनाने आज मंगळवारी जाहीर केला. खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांनी या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.तर अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी पत्र देऊन चर्चा केली होती.

या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे १५ हजार ७० कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्यात येणार असून, त्यांचे सध्याचे वेतन कायम ठेवले जाणार आहे. तसेच महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही देण्यात येणार आहे.

मात्र, या पदांवर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, निवृत्तीवेतन किंवा अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार नाही. ही अधिसंख्य पदे संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच कायम राहतील. त्यानंतर ती आपोआप रद्द होतील आणि त्या जागांवर नव्याने भरती केली जाणार नाही.

एनएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाने हा जीआर जारी केल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असून, या निर्णयाबद्दल दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे