न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

देशभर युवा वर्गाचे आंदोलन पसरले… आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाला विरोधकांचे हत्यार न बनविण्यासाठीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलन अखेर स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या वतीने आयोजित बैठकीत सीजेपीच्या तीन मुख्य मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अचानक का घेण्यात आला, यामागील मोदी सरकारची मोठी रणनीती आणि ‘इनसाईड स्टोरी’ आता समोर आली आहे

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा फटका स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक प्रतिमेला बसत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ‘केंद्र सरकार देशातील तरुणांच्या प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील आहे’, असा स्पष्ट संदेश सरकारला द्यायचा होता. दिल्लीबाहेरही या आंदोलनाची धग पसरू लागल्याने पंतप्रधान चिंतेत होते. केंद्र सरकार तरुणांच्या विरोधात आहे असा संदेश जाऊ नये, यासाठीच थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचा मोठा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असल्याचे सांगितले जात आहे

धर्मेंद्र प्रधान यांना शुक्रवारी रात्री उशिराच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, असे स्पष्ट संकेत वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आले होते. या घडामोडींनंतर शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांनी आपला राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे, राजीनाम्याची माहिती अधिकृतपणे समोर येण्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली होती, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे