न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुण्यात कार अपघातामध्ये चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे/ गौरी देसाई 

 शिरूर तालुक्यातील निमोणे येथे मध्यरात्री काळे कुटुंबावर काळाने घाला घातला. कारच्या भीषण अपघातात चिमुकलीसह ३ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर–न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका का आणि कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पवन काळे, आराध्या काळे आणि बाळासाहेब नागवडे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  भीषण अपघातानंतर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे