न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीच्या YBIT चा सलग तिसऱ्या वर्षी ‘साऊथ इंडिया इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रम यशस्वी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

 सावंतवाडीतील  यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या १११ विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली. बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरी आणि महाबलीपुरम या शहरांमधील प्रमुख उद्योग आणि संशोधन संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला. दक्षिण भारतातील औद्योगिक प्रकल्पांना भेट देण्याचे कॉलेजचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

बेंगळुरूमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला भेट देऊन विमाने आणि हेलिकॉप्टर निर्मितीची प्रक्रिया जवळून पाहिली. विश्वेश्वरय्या म्युझियममध्ये अभियांत्रिकीच्या विविध संकल्पना प्रयोगांद्वारे समजून घेतल्या. चेन्नईमधील प्रसिद्ध आयआयटी मद्रास येथे स्टार्टअप संस्कृती आणि संशोधनावर आधारित विशेष सत्रात सहभाग घेतला. यावेळी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचे निओमोशन या स्टार्टअपच्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

विद्यार्थ्यांनी महाबलीपुरम येथील युनेस्को मान्य प्राचीन शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्राचाही अभ्यास केला. बेंगळुरूचे इस्कॉन मंदिर आणि पाँडिचेरी येथील श्री अरबिंदो आश्रम यांसारख्या ठिकाणांना भेट देऊन सांस्कृतिक वारसा अनुभवला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि टीमवर्क वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गटांत विभागून गुण देण्याची पद्धत या भेटी दरम्यान राबवण्यात आली. या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य आणि उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण झाली.

या यशस्वी दौऱ्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले. विभागप्रमुख प्रा.स्वप्नील राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.प्राजक्ता राणे, प्रा.बोनी शेरॉव्ह व प्रा.मदीहा शेख यांनी या दौऱ्याचे नियोजन, समन्वय व यशस्वी अंमलबजावणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे