डीएलआर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध: व्यवस्थापकीय संचालिका कॅरेल फर्नांडिस
सिंधुदुर्ग / राजू तावडे
शालेय शिक्षणानंतर आपण आपले करियर हॉटेल मॅनेजमेंट, आयटी सारखे क्षेत्र किंवा वडिलोपार्जित पारंपारिक धंदा सांभाळण्यात करतो. जर तुम्ही कसिनो प्रशिक्षण घेतले तर आज तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कसिनोचे प्रशिक्षण व कसिनोचा अनुभव तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला इतर देशात महिना तीन लाख ते दहा लाख रुपये कमावण्याची संधी आहे. हे कसिनोचे प्रशिक्षण आम्ही गोवा येथे आमच्या शासनमान्य डीएलआर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत तरुण तरुणींना देतो, अशी माहिती डीएलआर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका कॅरल फर्नांडिस यांनी दिली.
डीएलआर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ॲण्ड रिक्रृटमेंट या देशातील पहिल मान्यताप्राप्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने आज शनिवारी सावंतवाडी येथील नवसरणी सभागृहात मोफत करिअर मार्गदर्शन व भरती चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी कॅरल फर्नांडिस बोलत होत्या. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या चर्चासत्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, पत्रकार राजू तावडे, शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्टजचे जीएम मनोज घाटकर, सावंतवाडी तालुका मोटार मालक संघाचे तालुकाध्यक्ष बावतिस फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते सुंदर गावडे यावेळी उपस्थित होते.
कॅरेल फर्नांडिस म्हणाल्या, कॅसिनो गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाबद्दल सांगायचे झाल्यास अनेकांना वाटते की हा उद्योग म्हणजे फक्त जुगार आहे. पण खरे चित्र वेगळेच आहे. हा उद्योग व्यवसायिक सेवा, ग्राहकांचे स्वागत, शिस्त, संवादकौशल्य, टीमवर्क आणि जागतिक दर्जाच्या करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो. डीएलआर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना गोवा तसेच देश विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याची संधी उपलब्ध करून देतो. मी सावंतवाडी येथील रहिवासी असून सावंतवाडीतच शिकून मोठे झाले. सावंतवाडी व कोकणातील मुलांना त्याचा फायदा व्हावा व रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणूनच हे सेमिनार येथे आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर म्हणाले, कॅरेल फर्नांडिस या येथील स्थानिक असून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना गेमींग आणि हॉस्पिटलिटीत करिअर करण्यासाठीची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यशाची नवी संधी या प्रशिक्षणातून प्राप्त होणार आहेत. गेमींग आणि हॉस्पिटलीटीत करिअरची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यावाशीयाना मिळावी यासाठी फर्नांडिस यांनी सावंतवाडीत चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल श्री. साळगावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी कॅंडिडा फर्नांडिस, ब्लॅंडिनो फर्नांडिस, कल्पेश फुलसुंगे, क्लाइव्ह जो फर्नांडिस यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागाचे मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथील केविन, हैदराबाद येथील रोशन आणि नागपूर येथील श्रीहर्ष या प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रिचर्ड डिसोझा यांनी केले. नवसरणी येथे झालेल्या या चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळाला.


