औंढा नागनाथमध्ये ट्रॅक्टर मुळे प्रचंड वाहतूक कोंडी…
हिंगोली/
हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ओव्हरलोडींग मुळे भीषण अपघात झाल्याने परभणी औंढा राज्यमार्गावर मोठी वाहतूक खोळंबली आहे, एसटी महामंडळाच्या बसेस देखील या अपघातामुळे रस्त्यावर अडकून पडल्या होत्या तर औंढा नागनाथ कडे दर्शनासाठी येणारे भाविक एक ते दीड तास रस्त्यावर ताटकळत थांबले होते, सध्या शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू आहे आणि हा ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून कारखान्याकडे घेऊन जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे मात्र ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्या जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे दरम्यान याकडे आरटीओ विभागासह वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिक करत आहेत


