बेंगळुरू पुणे महामार्गावर दरी पुलाजवळ सात आठ वाहनं एकमेकांवर आदळली
सातारा| वृत्तसंस्था
बेंगलोर मुंबई महामार्गावर असणाऱ्या पुण्यातील दरी पुलावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात ते आठ वाहनांचं मोठं नुकसान झालं. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा या अपघातात समावेश होता. यातील एका वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की काही वाहनं पुलावरील रेलिंगला धडकल्याने संपूर्ण रेलिंग च नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी सुद्धा पुण्यातील नवले पूल तसेच दरीपूल या भागात होणाऱ्या अपघाताच्या संदर्भातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.”


