न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मराठा आंदोलन…अनेक जिल्ह्यांत सुट्टी

जालना/ वृत्तसंस्था

आंतरवाली”येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण मराठवाड्यात बंद पाळला जात आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे (”

“परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण मराठवाड्यात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वत्र कडकडीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील बिघडती परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाकडून सर्व महत्त्वाच्या चौक, महामार्ग आणि सरकारी कार्यालयांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे