न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर २०तासांहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी

पुणे/

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मावळ परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. या अपघाताला तब्बल २०तास उलटून गेले तरीही वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. याचा परिणाम केवळ एक्सप्रेसवेवरच नाही, तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही दिसून येत असून दोन्ही मार्गांवर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस गळतीचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून अत्यंत सावधगिरीने काम सुरू असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, लोणावळा ते थेट तळेगावपर्यंत वाहनांची कोंडी पाहायला मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे