न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उबाठा शिवसेना व मनसेने नोंदवली एकत्रित हरकत 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर व इतर गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एकत्र आले असून, उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांच्याकडे आज गुरुवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधात त्यांनी एकत्रित हरकत नोंदवली. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, ठाकरे सेना उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाचा नियोजित शक्तिपीठ महामार्ग बांदा शहरातून जात आहे. त्यामुळे बांदा येथील व्यापारी, शेतकरी यांचे अतोनात नुकसान होणार आहे. बांदावाशियांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्राम्हण देव हे देवस्थान या महामार्गामुळे बाधित होणार आहे. बांदा ही जिल्ह्यातील मोठी व्यापार पेठ असून या ठिकाणी आजूबाजूच्या अनेक गावातील लोक बाजारासाठी येऊन उदरनिर्वाह करीत असतात. त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्य असलेल्या या भागाची व तेथील पर्यावरणाची अतोनात हानी या शक्तिपीठ महामार्गामुळे होणार आहे. त्यामुळे आम्ही शक्तीपीठ महामार्गाला हरकत नोंदवत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी उबाठा शिवसेना व मनसे ठामपणे उभी राहणार असल्याचे यावेळी श्री. साईप्रसाद काणेकर व मिलिंद सावंत यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे