न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

केएलई रुग्णालयाची बाह्यरुग्ण तपासणी आंबोली प्रा. आरोग्य केंद्रात सुरू करावी

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

    बेळगाव केएलई रुग्णालया मार्फत बाह्यरुग्ण तपासणी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून एकदा सोमवारी कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी आमदार प्रतिनिधी रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत आमदार दीपक केसरकर यांचे शिफारस पत्र घेऊन दिव्या सूर्याजी यांनी केएलई रुग्णालयाची बाह्यरुग्ण तपासणी आंबोली येथे सुरू करण्याची मागणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर व केएलई रुग्णालयाचे अधिकारी डॉ.आलम प्रभू यांच्याकडे केली आहे. केएलई रुग्णालयाची बाह्यरुग्ण तपासणी आंबोली येथे सुरू झाल्यास आंबोली, चौकुळ, गेळे भागातील रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याकरिता मायकल डिसोजा यांनी याकडे लक्ष वेधले आहे.

आमदार दीपकभाई केसरकर यांच्या पाठपुराव्याने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत रुग्ण कल्याण नियामक समिती आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केले. यावेळी के.एल.ई चे जनसंपर्क अधिकारी राजू हडिमणी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे