न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई गोवा महामार्गावर हातखंबात असलेले एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर 

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अस्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केल्याची घटना मंगळवारी  पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस आलेले आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शाखा व्यवस्थापक शितल रमाकांत शिंदे  यांनी  तक्रार दिली. त्यानुसार, हातखंबा येथील बँक शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून त्या कार्यरत आहेत. मंगळवारी पहाटे बँकेतील सहकाऱ्याने फोन करून एटीएम मशीन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडल्याची माहिती दिली.

त्यानंतर तक्रारदारांनी बँकेत जाऊन पाहणी केली असता एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे