गुज्जूला कानडी हिसका… बेंगळुरू आयपीएल सलग दुसऱ्यांदा विजेता.. महाराष्ट्रातही आनंदोत्सव
अहमदाबाद/ प्रथमेश कुडतरकर
रसिक सलाम, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या भेदक गोलंदाजी आणि विराटच्या नाबाद (२षटकार ९ चौकार) ४२ चेंडुत ७५ अर्धशतकासह वेंकटेश घ्या आकर्षक ३२ धावां, डेव्हिड २४ धावांच्या जोरावर पाटीदारच्या बेंगळुरूने गुजरातवर सहज मात करीत आयपीएलचे विजेतेपद पटकाविले… या आनंदाचा महाराष्ट्रातही फटाक्यांची आतषबाजी करीत अनेक ठिकाणी उत्साह व्यक्त केला गेला. बेंगळुरू ने हा सामना ५ फलंदाज आणि १२ चेंडु राखून जिंकला. गुजरात तर्फे राशिद ने दोन बळी घेतले. रबाडाचा फेस कढीत ३ षटकात ४४ धावा कुटल्या गेल्यात.
तत्पूर्वी रसिक सलाम, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने गुजरात टायटन्सला केवळ १५५ धावांवर रोखले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पॉवरप्लेमध्ये जोश हेझलवूडने कर्णधार शुभमन गिलला आणि भुवीने साई सुदर्शनला बाद केल्यामुळे गुजरातवर दबाव आला. सुरुवातीच्या या धक्क्यातून गुजरात कधीच सावरले नाही. सामन्यातील गुजरातची सर्वोच्च भागीदारी निशांत सिंधू आणि जोस बटलर यांच्यात केवळ 29 धावांची होती. वॉशिंग्टन सुंदरने गुजरातसाठी अर्धशतक झळकावले आणि 37 चेंडूंमध्ये 50 धावा करून तो नाबाद राहिला. आरसीबीसाठी रसिक सलामने सर्वाधिक बळी घेतले, त्याने चार षटकांत 27 धावा देऊन तीन बळी मिळवले. हेझलवूड आणि भुवीने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर कृणाल पांड्याने एका बळीची भर घातली. यामुळेच गुजरातला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 155 धावा करता आल्या. आरसीबीला सलग दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी 156 धावांची गरज होती ती त्यांनी लिलया पार करीत विजेतेपद पटकावले.



