शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलीवर कुत्र्यांचा हल्ला
गोंदिया/ वृत्तसंस्था
गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सकाळी, शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून तिला जखमी केले. मोकाट कुत्र्यांची दहशत शहरात पसरली आहे.तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


