न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जमिनीच्या वादातून मळेवाडमध्ये दोन गटांत राडा; २५ जणांविरोधात गुन्हा दाखल

सिंधुदूर्ग राजू तावडे 

 

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-नाईकवाडी येथे जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून दोन गटांत जोरदार संघर्ष झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात १३ जणांची नावे नमूद करून अन्य व्यक्तींसह एकूण २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश सिताराम कारुंडेकर (वय ६५, रा. मळेवाड-नाईकवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये नंदकिशोर नारायण नाईक, दाजी समाका नाईक, लक्ष्मण नाईक, अमोल आनंद नाईक, आत्माराम नाईक, तुषार नाईक, गुरुप्रसाद नाईक, पद्माकर नाईक, अमित हरिश्र्चंद्र नाईक, सविता नाईक, प्राजक्ता समाकांत नाईक, इंदू नाईक आणि हर्षा नाईक यांच्यासह अन्य व्यक्तींचा समावेश आहे.

मळेवाड येथील सर्व्हे क्रमांक ११६ (२) व ११७ (२) या जमिनीच्या मालकी हक्कावरून तसेच खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून दोन्ही गटांत वाद सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित जमीन खरेदी केल्यानंतर विरोधकांनी खरेदीखत रद्द करण्यासाठी तलाठी कार्यालयात दावा दाखल केला होता.

६ नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादी कुटुंबीयांसह घरी असताना संशयितांनी जमाव करून त्यांच्या घराच्या गेटजवळ येत शिवीगाळ केली. गेटचे नुकसान करून परवानगीशिवाय अंगणात प्रवेश केल्याचाही आरोप आहे. यावेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेदरम्यान फिर्यादींची सून सूचि कारुंडेकर या मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण करीत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून फेकून देत नुकसान करण्यात आले. तसेच त्यांनाही मारहाण करण्यात आली. फिर्यादींची सून साक्षी राजेश कारुंडेकर यांना धक्काबुक्की करून पाठीत मारहाण केल्याचा आरोप आहे.

फिर्यादींचा मुलगा राजेश कारुंडेकर याला घराबाहेर पडल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच घराशेजारील दुकानगाळे उघडल्यास त्यांची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेमुळे मळेवाड परिसरात खळबळ उडाली असून सावंतवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे