न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली रेडकर ’ 

 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    डिजिटल माध्यमातून कोकणची संस्कृती, परंपरा आणि पर्यटन वैभवाची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या रहिवासी सौ. वृषाली सुधाकर रेडकर (कोकणची Russhali) यांना भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित ‘भारत पर्व २०२६’ या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. देशभरातील निवडक डिजिटल कंटेंट क्रिएटर्समध्ये त्यांची झालेली निवड ही सावंतवाडीसह संपूर्ण कोकणच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मुंबई तर्फे (PIB) तिची निवड करण्यात आली होती.

गुजरातमधील एकतानगर येथे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव पार पडला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवात देशातील विविध राज्यांची सांस्कृतिक विविधता, लोककला, परंपरा, हस्तकला आणि पर्यटनवैभव यांचे दर्शन घडविण्यात आले. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनस्थळे डिजिटल माध्यमांतून जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘इनक्रेडिबल इंडिया’ या उपक्रमालाही यामध्ये महत्त्व देण्यात आले.

या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मांडण्याची जबाबदारी वृषाली रेडकर यांच्याकडे आली. विशेषतः कोकणचा निसर्ग, येथील समृद्ध परंपरा, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनस्थळे यांना डिजिटल माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सहभागाला महत्त्व आहे.

स्थानिक पातळीवरून सुरू झालेला डिजिटल प्रवास राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचणे, ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून कोकणातील नव्या डिजिटल अभिव्यक्तीला मिळालेली दखल आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावंतवाडीच्या नावलौकिकात भर पडली असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे