न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्हा ग्रंथालय संघामार्फत ६ डिसेंबरला जिल्हास्तरीय वाचक स्पर्धा

 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने यावर्षी हि तालुका ग्रंथालयांच्या सहकार्याने ‘सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वाचक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ही स्पर्धा प्रथम तालुकास्तरावर घेतली जाईल. यामध्ये सहभागी होणारा स्पर्धक संबंधित तालुक्यातील कोणत्याही ग्रंथालयाचा वाचक असणे बंधनकारक आहे. तालुका स्तरावरील स्पर्धेतून अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळेल. सर्व तालुका ग्रंथालयांनी ६ डिसेंबर २०२६ पूर्वी तालुकास्तरीय स्पर्धा घेऊन विजेत्या तीन क्रमांकांची नावे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठवायची आहेत.(स्पर्धेसाठी वेळ: १० मिनिटे)
जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता राव बहादूर अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे होणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रसिद्ध साहित्यिका श्रीम. कुमुद गजानन रेगे यांची कोणतीही साहित्यकृती हा विषय असणार आहे. स्पर्धकांसाठी श्रीम. कुमुद रेगे यांची ‘आई’, ‘उर्वशी’, ‘कालचक्र’, ‘गंधार’, ‘घरकुल’, ‘नंदादीप’, ‘नकोशी’, ‘नियती’, ‘निसर्गकन्या प्राजक्त’, ‘भैरवी’, ‘मनस्विनी’, ‘मैत्री’, ‘वृंदा’, ‘वेगळ्या वाटेने जाताना’, ‘सखी’, ‘सावत्रबाप’ आदी साहित्यकृती राव बहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धेतून यशस्वी होणाऱ्या पहिल्या पाच क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक: रु. १०००/- व प्रशस्तीपत्र,द्वितीय क्रमांक: रु. ७००/- व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक: रु. ५००/- व प्रशस्तीपत्र, चौथा क्रमांक: रु. ३००/- व प्रशस्तीपत्र, पाचवा क्रमांक: रु. २००/- व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आवश्यक ते मार्गदर्शन जिल्हा ग्रंथालय संघाचे संबंधित तालुक्यातील जिल्हा संघ प्रतिनिधी करणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनाबाबत किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कुडाळ: श्री. जयेंद्र तळेकर (७५८८९०१९८३), राजन पांचाळ (९४२३०२६७३५),कणकवली: श्री. धाकू तानवडे (९४२११४७८६८), सावंतवाडी व दोडामार्ग: श्री. भरत गावडे (९४०३०८७७९६), श्री. विठ्ठल कदम (९८२३०४८१२६), ॲड. संतोष सावंत (९४२३०५१५३०), वेंगुर्ला: श्री. महेश बोवलेकर (९४२३३००७४४), श्री. गुरुनाथ मडवळ (९४२३३०९५५५), श्री. नंदन वेंगुर्लेकर (९४२२४३४३५६), मालवण: श्री. रुजारियो पिंटो (९४२२०५४६००), श्रीम. ऋतुजा केळकर (९४२०४२३७९०), श्री. संजय शिंदे (९४२२२३४९५०) या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव राजन पांचाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त वाचकांनी आणि पुस्तकप्रेमींनी या वाचक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे