न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

वेंगुर्ल्यात नरकासुर स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

कोकणच्या मातीत रुजलेली परंपरा, लोकसंस्कृतीचा वारसा आणि दिवाळीतील नरकासूर दहनाची अनोखी परंपरा यांचा सुंदर संगम जय हनुमान मित्र मंडळ आयोजित नरकासूर स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. युवकांच्या कल्पकतेला कलात्मकतेची जोड देत साकारण्यात आलेल्या भव्य नरकासुरांच्या प्रतिकृतींनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. स्पर्धेच्या प्रारंभापासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शानदार शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने विशाल परब यांनी आयोजन केले.  यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ल्याचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक सचिन शेट्ये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नरकासूर स्पर्धा म्हणजे केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून युवकांच्या कल्पकतेला, कलागुणांना आणि संघटनात्मक कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. अशा स्पर्धांमुळे नव्या पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख होते. तसेच कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणाही मिळते.

दिवाळीच्या उत्साहात रंगलेल्या या स्पर्धेमुळे सावंतवाडीतील वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले असून, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या आयोजनाचे खास वैशिष्ट्य ठरले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे