न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सुतळी बॉम्ब लहान मुलाच्या हातात फुटून चार बोटे निकामी…

 जळगाव. वृत्तसंस्था

 दिवाळी म्हणजे खुसखुशीत फराळ आणि त्याच्या जोडीला फटाके, त्यातही मुलांना फटाके फोडण्यात वेगळाच आनंद असतो. मात्र काही वेळा निष्काळजीपणा नडतो आणि दुर्घटना घडते. जळगावात हातात फटाका फुटल्याने दहा वर्षांच्या मुलाची चारही बोटे निकामी झाली. इतकंच नाही तर चेहरा देखील भाजला. त्याचं झालं असं की जळगाव शहरातील पवार कुटुंबिय मोठ्या उत्साहानं फटाके फोडत असताना मात्र कृष्ण पवार यांच्या वीर नावाच्या मुलाच्या हातातच सुतळी बॉम्ब फुटला. रक्तबंबाळ झालेल्या वीरला कुटुंबियाने त्वरीत डॉक्टरांकडे नेले.”

डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्याने करंगळी आणि अंगठा वगळता या मुलाची इतर बोटं वाचली असली तरी प्रत्येक वेळेला त्वरीत उपचार मिळून दिलासा मिळेलच असं नाही. आपल्या नातवावर जो प्रसंग आला तसा कुणावर येऊ नये म्हणून पालकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन वीर पवारच्या आजीने केले आहे”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे