न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

मराठा समाजाच्या गुणवंतांचा सोमवारी गौरव सोहळा 

सिंधुदुर्ग राजू तावडे 

     बांदा मराठा समाजाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचा नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंतांचा गौरव सोहळा सोमवार दिनांक ९ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सहा गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार असून, समाजाच्या नवनियुक्त महिला कार्यकारिणीचे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचे देखील जाहीर अभिनंदन व स्वागत करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता नाडकर्णी सभागृह, नट वाचनालय, बांदा येथे होणार आहे. या सोहळ्यात एम.एस्सी. रसायनशास्त्र परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारी अंजली गोविंद सावंत, डॉक्टर पदवी प्राप्त केलेली अर्पिता अविनाश पंडित, उत्कृष्ट कामगिरीबद्दल लोकमान्य मल्टीपर्पजचे ‘बेस्ट मॅनेजर’ पुरस्कार प्राप्त तुळशीदास गवस, पोलीस उपनिरीक्षक सौ. श्रद्धा भानुदास दळवी, सौ. दीक्षा दिनेश नाईक, आणि विशेष यश संपादन करणारा नैतिक नीलेश मोरजकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच बांदा मराठा समाजाच्या नवनियुक्त महिला कार्यकारिणीचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीत यश मिळविलेल्या 6 सदस्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.

समाजातील गुणवंतांच्या यशाचे कौतुक करणे, त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे, हा या गौरव सोहळ्यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमाला मराठा समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत व सचिव सिताराम गावडे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे