न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘महाप्रतापी १७ मराठा’ बटालियनचा ६४ वा स्थापना दिवस (रेझिंग डे) सोहळा १५ नोव्हेंबरला ओरोस येथे

सिंधुदुर्ग  राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘महाप्रतापी १७ मराठा’ बटालियनचा ६४ वा स्थापना दिवस (रेझिंग डे) सोहळा भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न होणार आहे.

देशसेवेचा आणि पराक्रमाचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या ‘महाप्रतापी १७ मराठा’ बटालियनचा ६४ वा स्थापना दिवस (रेझिंग डे) यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत दिमाखात साजरा केला जात आहे.

सैनिकांप्रती आदर आणि अपार प्रेम व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोरातून आजी-माजी सैनिक, वीर माता, वीर नारी, सन्माननीय वीर पत्नी, रिटायर्ड आजी-माजी सैन्य अधिकारी आणि सैनिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची तारीख व वेळ:

रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६

सकाळी ठीक ०९:३० वाजता

कार्यक्रमाचे ठिकाण:

श्री शरद कृषी भवन हॉल, ओरोस, सिंधुदुर्ग.

देशासाठी प्राण पणाला लावणारे वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सहभागाने हा सोहळा अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. या सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग १७ मराठा रुईया परिवाराच्या वतीने सचिव गुरूप्रसाद राणे यांनी केले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे