न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार केसरकर यांनी शहरातील व्यापारी वर्गाला दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा 

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे 

    दीपावलीच्या निमित्ताने लक्ष्मी-कुबेर पुजन निमित्त माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातील बाजारपेठांना भेट देत व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच व्यापारी पेठांमधील पूजन केलेल्या लक्ष्मीचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

श्री. केसरकर यांनी आपल्या निवासस्थानासह संकुलात लक्ष्मी पूजन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर उपस्थित होत्या. यानंतर श्री. केसरकर यांनी संपूर्ण शहरातील दुकानांत जात व्यापारी वर्गाला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देवी लक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले, लक्ष्मी देवता ही समृद्धीची देवता असून नेहमी सुख-समृद्धी ही पृथ्वीतलावर लक्ष्मीच्या पावलाने येत असते. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये लक्ष्मीची कृपा असावी आणि आपले सर्व नागरिक सुखी व्हावेत. व्यापारी, बागायतदार, शेतकरी, महिला, मच्छिमार अशा सर्व घटकांना सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना त्यांनी देवी लक्ष्मीच्या चरणी केली. तसेच, सध्या दुष्काळामुळे आलेल्या अतिशय कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती महाराष्ट्राला देवी लक्ष्मीने द्यावी, असही साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, विश्वास घाग, आबा केसरकर, अर्चित पोकळे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे