मालवण तालुक्यातील बिळवस येथे घराला आग लागून घरासह पाच गाड्या जळून खाक
सिंधुदुर्ग राजू तावडे
मालवण तालुक्यातील बिळवस भोगलेवाडी येथे गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुनील सोमा भोगले यांच्या बंद घराला अचानक भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले असून घराच्या आवारात उभी असलेली पाच वाहनेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या दुर्घटनेत कुटुंबाचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य मुंबईत असल्याने एक मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवितहानी झाली नाही.
म


