न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील उभाबाजार येथे फन फेअर चे आयोजन खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

 

सिंधुदुर्ग राजू तावडे

सावंतवाडी शहरात प्रथमच दिपावली निमित्त उभाबाजार बाल गोपाल मित्र मंडळाच्या वतीने फन फेअर चे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार १३ ते १५ नोव्हेंबर रोजी हा फन फेअर उभाबाजार येथे भरविण्यात आला आहे.या फन फेअर चे उद्घाटन शुक्रवार सायंकाळी होणार आहे.तर शनिवारी १४ रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या निमित्ताने विविध खाद्य पदार्थाची मेजवाणी तसेच लहान मुलांसाठी खेळाचे स्टॉल उभारण्यात येणार असून त्याचा आनंद घेता येणार आहे.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे यावर्षी प्रथमच दिपावली निमित्त फन फेअर चे आयोजन करण्यात आले आहे.हा फन फेअर उभाबाजार येथील हनुमान मंदिर पासून छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्या पर्यत खाद्य पदार्थाचे तसेच लहान मुलांच्या खेळाचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.तर शनिवारी सायंकाळी सात वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तब्बल तीन दिवस हा फन फेअर चालणार असून सावंतवाडीत शहरातील नागरिकांनी या फन फेअर मधील स्टॉल चा आस्वाद घ्यावा असे आवाहन उभाबाजार बाल गोपाल मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे