न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या समस्या सोडवण्यासाठी १९ नोव्हेंबरला बैठक: जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १२८ शासन मान्य ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासंदर्भात व त्याचा निपटारा कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टीने १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित केल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व संचालक ॲड. संतोष सावंत यांनी श्री. कामत यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांना काय अडचणी, समस्या भेडसावत आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती दिली. व एकत्रित बैठक घेऊन समस्या, अडचणींवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने विचार व्हावा, असे श्री. मस्के यांनी सुचित केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. कामत यांनी निश्चितपणे ग्रंथालयांना काय समस्या, अडचणी आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करू. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीही भेट घेण्यात आली. श्री सावंत यांनी जिल्हा ग्रंथालय संघाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, तसेच १२८ ग्रंथालयांना साहित्य वाटप तसेच विविध मार्गांनी सहकार्य केले जाईल. पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी याविषयी चर्चा करून ग्रंथालयांच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, असे सांगितले.

श्री. प्रभाकर सावंत म्हणाले, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुस्तक संच भेट स्वरूपात देत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ग्रंथालय उभारणीसाठी पुस्तक संच भेट दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण यंदाच्या दिवाळीला एक अनोखा उपक्रम राबवला. आपण अनेक अधिकारी वर्गांना खास पुस्तक संच भेट देऊन दिवाळी साजरी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ व्यापकतेने पुढे जाणे गरजेचे आहे, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे