न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

चार दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डयांत दिवे लावणार : देव्या

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी प्रभागातील एमएनजीएल आणि नळपाणी योजनेच्या कामासाठी खोदलेले रस्ते येत्या चार दिवसांत पूर्ववत करण्यास सुरुवात करावी. अन्यथा, खड्डयांमध्ये दिवे पेटवून दिवाळी साजरी करत सत्ताधाऱ्यांचा व प्रशासन निषेध नोंदवला जाईल, असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
प्रभागातील विकासकामानंतर रस्त्यांचे रिस्टोरेशन व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या खड्डयांमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या दुचाकींचे अपघात होऊन नागरिक जखमी होत असल्याची तक्रारी येत आहे. मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही होत नाही. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप श्री. सुर्याजी यांनी केला आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन चार दिवसांत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करावे. अन्यथा, खड्डयांमध्ये दिवे लावत दिवाळी साजरी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला जाईल, असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे