न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी: साईप्रसाद कल्याणकर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

   बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. साईप्रसाद कल्याणकर यांनी मंगळवारी सकाळी सीमा तपासणी नाका, इन्सुली येथे भेट देऊन सुरू असलेल्या वाहन तपासणी मोहिमेची पाहणी केली. यावेळी मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या टिप्परमधील मालावर ताडपत्री नसल्यामुळे रस्त्यावर माल सांडून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा सर्व वाहनांमधील मालावर ताडपत्री टाकूनच वाहतूक करण्यात यावी, अशी विनंती श्री. कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना केली.

सीमा तपासणी नाका इन्सुली येथे या महिन्यात आजपर्यंत ताडपत्री न टाकता वाहतूक करणाऱ्या ३७ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याणकर यांना देण्यात आली. या प्रभावी कार्यवाहीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी सर्व वाहनमालक व चालकांना आवाहन केले की, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करून प्रत्येक टिप्परमधील माल व्यवस्थित ताडपत्रीने झाकूनच वाहतूक करावी.

या तपासणी मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक श्री. वसंत कलंबरकर, मोटार वाहन निरीक्षक श्री. माणिक चोरमले आणि लेखापाल श्री. राजू ओसरमल यांच्या सहकार्याने वाहन तपासणी व कारवाईचे काम प्रभावीपणे सुरू आहे.

आपल्या निष्काळजीपणामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ देऊ नका. वाहनातून मालाची वाहतूक करताना ताडपत्रीचा वापर करा, वाहतुकीचे नियम पाळा आणि संभाव्य अपघात स्वतःबरोबर इतरांचे नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करा.

सुरक्षित वाहतूक ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाचे सामाजिक कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया श्री.

कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे