न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

निरवडे गावातील रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची उपस्थिती 

सिंधुदुर्ग राजू तावडे 

    सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

यामध्ये सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते निरवडे पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी तसेच भाईडवाडी ते शेटकरवाडी या चार रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे गावातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सुलभ होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी निरवडे सरपंच सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, धर्मा माळकर, नारायण माळकर, बाळ्या बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी गावाच्या वतीने सरपंच सुहानी गावडे यांनी आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे विशेष आभार मानले. गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे