न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर …. समान काम, समान वेतनाची मागणी 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

  उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी आणि आर्थिक लाभ मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी सावंतवाडीतील न्यायालयीन कर्मचारी आज मंगळवार पासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या संपात तालुका न्यायालयांसह विविध न्यायालयांमधील गट-क, गट-ड, लघुलेखक, बेलिफ तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जिल्हा व तालुका स्तरीय न्यायालयीन कर्मचाऱ्यांची भुमिका बघता त्यांनाही उच्च न्यायालयाप्रमाणेच वेतन श्रेणी देणे आवश्यक आहे. त्यांच्यावर अन्याय होता कामानये. त्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम न्यायदानावर झाला आहे असे मत ॲड. नाईक यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आमचा प्रस्ताव २२ महिने प्रलंबित असून त्याचे उत्तर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे समान काम, समान वेतन यासाठी आम्ही संप पुकारला आहे. सावंतवाडी तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून शासनाकडून योग्य न्याय आम्हाला मिळेल असा विश्वास न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग गट क सावंतवाडी तालुका प्रतिनिधी गंगाधर तांबे, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बेलीप संघटना सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका प्रतिनिधी राजेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना सावंतवाडी तालुका प्रतिनिधी अभय चव्हाण, शरद पाटील, प्रसाद मराठे, विलास सावंत, संजय रावराणे, अतिश छजलांनी, मोतीराम जाधव, शुभम शिंदे,सौ. देसाई,सौ. ओटवणेकर, सौ. शिंदे, दिशा नाईक व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे