न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा विठ्ठल मंदिराची जत्रा शनिवारी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव भागवत प्रबोधिनी कार्तिकी एकादशीला शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता काकडआरतीने हा सोहऴा आरंभ होईल. त्यानंतर दर्शनास सुरुवात होईल. सायंकाळी उत्सवमुर्तीचे मंदिरात आगमन होईल. सायं ५ ते ७ श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाची भजनसेवा होईल. ७ वाजता नित्य सायंआरती होईल. रात्रो ठिक ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा आरंभ होईल. या जत्रोत्सवानिमित्त रात्रो आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर,बांदा देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे