न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सुकून ‘ व्हिला प्रकल्प पर्यटकांना अद्यायावत सेवा पुरवणार : आमदार दीपक केसरकर 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    ‘ मेड फॉर यू ‘ हा पर्यटन प्रकल्प पर्यटकांचे आकर्षण ठरेल असून त्याचे पुढील पाऊल म्हणून नरेंद्र तारी यांनी येथेच सिंधूरत्न योजने अंतर्गत उभारलेला ‘ सुकून ‘ व्हिला हा प्रकल्प येणाऱ्या पर्यटकांना अद्यायावत सेवा पुरवण्याचे कार्य करेल. शिरोडा येथील ताज प्रकल्पाच्या ठिकाणी येणारे विविध भागातील व विविध देशातील पर्यटक या ठिकाणी नक्कीच भेट देतील, असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

सिंधुरत्न योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘सुकून’ या अध्यायावत व्हिला प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सोनुर्ली येथील ‘मेड फॉर यू’ या पर्यटन प्रकल्पाच्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली पोट्येकुंबयेवाडी येथे मेड फॉर यू हा पर्यटन प्रकल्प नरेंद्र तारी यांनी उभारला असून तेथे आता ‘सुकून’ व्हिला प्रकल्प सुरू होत आहे. याचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ह्या प्रकल्पात ॲडव्हेंचर स्पोर्ट्सह आता राहण्याचीही उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी सावंतवाडीचे नगरसेवक देव्या सुर्याजी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, महेश सामंत, बांदा गावचे माजी सरपंच अशोक सावंत, शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, मधु देसाई, लाडू धुरी, अजय पावसकर, दिव्या वायंगणकर, सुहास देसाई, सौ. अक्षया गिरप, नरेंद्र तारी, समिधा तारी, करूणेश तारी, सीमरन तारी, क्रीश तारी आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे