न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

१७ मराठा रेजिमेंटचा ६४ वा रेजिंग डे सोहळा थाटात संपन्न

सिंधुदुर्ग  प्रसाद राणे

भारतीय सैन्यदलाच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपणाऱ्या १७ मराठा रेजिमेंटचा ६४ वा रेजिंग डे सोहळा नुकताच सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात देशसेवेचा अभिमान, शहीद जवानांच्या बलिदानाची आठवण आणि सैनिक परिवारातील एकजुटीचे दर्शन घडले.

या सोहळ्याचे औचित्य साधून वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला ब्रिगेडियर चव्हाण आणि कर्नल किशोर भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भास्कर राणे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

देशाच्या विविध भागांतून अधिकारी, आजी-माजी सैनिक, सेवेतील जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. सैनिकांच्या शौर्याचा गौरव, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना आदरांजली आणि सैनिक परिवाराच्या योगदानाचा सन्मान अशा भावपूर्ण वातावरणात १७ मराठा रेजिमेंटचा ६४ वा रेजिंग डे सोहळा उत्साहात पार पडला.

श्री गणपती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात; वीरपत्नींचा सन्मान सोहळा भावनिक
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती स्तवनाने करण्यात आली. त्यानंतर श्री त्रिंबोली माता देवीचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
या सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान सोहळा. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत सहभागी झालेले शहीद नायक गोविंद गावडे यांच्या पत्नी सत्यवती गावडे, तसेच १९८८ मध्ये श्रीलंकेत शहीद झालेले रामचंद्र गावडे यांच्या पत्नी सीताबाई गावडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्ग रईवा परिवाराचे अध्यक्ष शशिकांत गावडे, दशरथ चव्हाण आणि विलास राणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी वीरपत्नींच्या त्यागाचे आणि देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांचे वातावरण भावूक झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे