सावंतवाडीतील युवा नेते आशिष सुभेदार याचे निधन
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष युवा नेते आशिष सुभेदार (३१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते काही दिवस आजारी होते.. त्यांना बांबोळीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.