उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी दिल्या व्यापारी व सावंतवाडीकरांना दिपावलीच्या शुभेच्छा
सिंधुदूर्ग/ राजू तावडे
दीपावली आणि लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहरातील नागरिकांसह बाजारपेठांना प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी व्यापारी वर्गासह सावंतवाडीकरांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी येथील सुवर्ण पेठ, मुख्य बाजारपेठेसह विविध व्यापारी पेठांमधील पुजन करण्यात आलेल्या देवी लक्ष्मीचे दर्शन उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी घेतले. यावेळी सर्वांच्या व्यवसायात भरभराट होवो, सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली. तर शहरातील नागरिकांच्या निवासस्थानी जात त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा ॲड. निरवडेकर यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे उपस्थित होते.


