रायगड/ वृत्तसंस्था
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. माणगाव शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर आणि पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.”


