न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

गोकुळ वाचविण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रस्त्यावर

कोल्हापूर वृत्तसंस्था

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निकालानंतर महायुतीकडून पाच तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रात महायुतीच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट पसरली असून अवघ्या देशामध्ये या निर्णयाची चर्चा सुरू आहे. गोकुळमध्ये 25 पैकी 13 जागा जिंकलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात रस्त्यापासून कोर्टापर्यंत लढाईची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वात ‘संघर्ष मोर्चा’ निघाला आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी अवघ्या जिल्ह्यातूनच नव्हे तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शेतकरी एकटवले आहेत. तर या मोर्चात काळ्या झेंड्यासह खुद्द सतेज पाटलांनी देखील निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे