धाराशिवात घराला आग लागून सहा जणांचा होरपळून मृत्यू
धाराशिव वृत्तसंस्था
धाराशिव जिल्ह्यातील येडशी इथं घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोविंद करंडे यांच्या घराला ही आग लागली असून घरात एकूण 12 माणसे होती. मध्यरात्री घराला अचानक आग लागल्याचे समजते. यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद करंडे यांचे करंडे किराणा अँड जनरल स्टोअर असे दुकान असून या किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब राहत होते. या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केल्याने करंडे कुटुंबातील सहा जणांनी जीव गमावला आहे


