न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा विठ्ठल मंदिरात काकड आरतीला आरंभ

सिंधुदुर्ग राजू तावडे 

   बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात आज मंगळवारी दिवाळी पाडव्यापासून काकड आरतीला आरंभ झाला. काकड आरतीसाठी दररोज पहाटे श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. हा सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो .

पहाटे पाच वाजता भूपाळी म्हणून काकड आरतीला प्रारंभ होतो. त्यानंतर तुपात भिजवलेल्या काकड्याच्या तेजस्वी ज्योतीने श्री विठ्ठल रखुमाईला ओवाळले जाते . यावेळी भजनकर्मी व भाविक पारंपारिक काकडा गीते म्हणतात.त्यानंतर पंचामृत अभिषेक होतो .यावेळी भजन सुरू असते. त्यानंतर महाआरती होते व सर्वांना तीर्थप्रसाद दिला जातो. हा सोहळा त्रिपुरारी पौर्णिमा मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून त्यादरम्यान शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी भागवत कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल मंदिराचा प्रतिवार्षिक जत्रोत्सव होणार आहे. दररोज पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात होणाऱ्या या काकड आरती सोहळ्याला भजनकर्मी, भाविक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले यांसह सर्व स्तरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे