न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरीत महालक्ष्मी मिनी मॉलला आग

रत्नागिरी मेघेश मोंडकर 

शहरातील के. सी. जैन नगर येथील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’मध्ये आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या आगीत मॉलचे अतोनात नुकसान झाले असून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज पहाटेच्या वेळी मॉलच्या इमारतीमधून अचानक मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारणी आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मॉलमध्ये प्लास्टिक आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररुप धारण केले. पहाटे लागलेली ही आग सकाळी उशिरापर्यंत पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे