न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी

 

सिंधुदूर्ग/ राजू तावडे

माजगांव येथील सुप्रसिद्ध शिल्पकार काका सावंत व पेंटर एस.टी सेवानिवृत्त मंगेश सावंत यांच्या विनामूल्य सहकार्यातून मोती तलावाच्या काठावर सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सदर पुतळ्याची रंगरंगोटी केली होती. त्यासाठी सुद्धा काका सावंत यांनी विनामूल्य पेंटिंग करून सहकार्य केले होते. परंतु कालांतराने पुतळ्यावरील रंग खराब झाला. याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी पुन्हा एकदा या पुण्यकामास पुढाकार घेऊन युवराज लखनराजे भोसले यांच्या परवानगीने सदरचे पुतळ्याचे काम विनामूल्य पूर्ण केले. यासाठी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे